(मुंबई-गोरेगाव / महेश्वर तेटांबे)
दिनांक २१ जुलै, २०२३ रोजी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०० सभासदांना घेऊन दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव पूर्व येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या जागरूक सभासदांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात आले. महामंडळाचे सभासद वासू पाटील (कला दिग्दर्शक) हे गेली २५ ते ३० वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत असं असुन त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडवणूक केली जाते. शिवाय प्रसिद्ध अभिनेते श्री अमोल कोल्हे यांनी मला बोलावले आहे, असे सांगून सुद्धा ऐकून न घेण्याच्या मनःस्थितीत असलेल्या सुरक्षारक्षकांची अरेरावी आणि हुकूमशाही चालू होती. मराठी चित्रपट महामंडळाच्या दृष्टीने लज्जास्पद आणि निषेधार्थ बाब असुन मराठीशाहीची गळचेपी झाली तर मराठी माणूस हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.
आज ही घटना एका सभासदाच्या बाबतीत घडली आहे, उद्या कुणाच्याही बाबतील घडू शकते तेव्हा ही शक्यता नाकारता येत नाही तेव्हा त्यासाठी ठोस उपाययोजना आखणे हे गरजेचे असल्याने या संदर्भात श्री विजय भा.भालेराव व्यवस्थापक (कल्लागारे) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) दादासाहेब फाळके चित्रनगरी, यांना अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या जागरूक सभासदांच्यावतीने एक निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात कला दिग्दर्शक वासू पाटील यांना दादासाहेब फाळके चित्रनगरी प्रवेशद्वाराजवळ प्रवेश नाकारला व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली या संदर्भात सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विजय भा.भालेराव यांनी झालेल्या गैरप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून त्याची पुनरावृत्ती होऊ नये याबाबत चित्रनगरीचे संचालक (एम.डी.) अविनाश ढाकणे यांना घडलेला वृतांत सांगून त्यांवर योग्य ती कारवाई करावी असे सांगितले. आणि यापुढे महामंडळाच्या कुठल्याही मराठी कलाकारांना अथवा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने प्रवेशबंदी करू नये अशी सूचना फिल्मसिटी मधील सर्व सुरक्षारक्षकांना देण्यात येईल असेही सांगण्यात आले.
याप्रसंगी दिग्दर्शक दिपक कदम, विजय राणे, चंद्रशेखर सांडवे, आर्यन देसाई, विनय गिरकर, गणेश तळेकर, विजय निकम, शिरीष राणे, विनोद डावरे, प्रफुल्ल ओमकार, अभिनेत्री सिद्धी कामथ, संकलक यश सुर्वे, वेस्टर्न इंडिया प्रोड्युसर असोशिएशनचे सरचिटणीस दिलीप दळवी, कार्यकारी निर्माते प्रमोद मोहिते, निर्मिती व्यवस्थापक यशवंत कुलकर्णी, देवेंद्र मोरे, अभिनेते सचिन घाणेकर, घनश्याम गोवेकर, सागर मयेकर, प्रवीण मोहिते, हरी जनार्दन सोनवडेकर, विनायक शानबाग, तुषार खेडेकर, नितीन पाटील, निर्माता संतोष राऊत तसेच आदी सभासद उपस्थित होते.