जाकादेवी (संतोष पवार )
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-आगवे येथे अधिकृतरित्या नव्याने सुरू झालेल्या पर्शुराम दूध उत्पादक सहकारी संस्था जाकादेवी व गोकुळ दूध संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी-आगवे येथे दूध शीतकरण केंद्र अधिकृतरित्या कार्यान्वित झाले असून या दूध संकलन केंद्रामध्ये जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग असून या शितकरण केंद्रात दररोज म्हैशीचे २ हजार आठशे लिटर तर गाईचे ३ हजार दोनशे लिटर दूध नियमित या केंद्रामध्ये शीतकरण केले जात आहे.
२१ ऑक्टोबर पासून जाकादेवी-आगवे येथे दूध संकलन केंद्र अधिकृतरित्या सुरू झाले आहे. या शीतकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा पर्शुराम दूध उत्पादक संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुधीरशेठ देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजया पर्शुराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीरशेठ देसाई, सेक्रेटरी प्रमोद उर्फ आबा देसाई, उपाध्यक्ष श्रीकांत सावंत, संचालक कृष्णकांत देसाई,अमोल देसाई, प्रतिक देसाई, सुहास देसाई, नयन मुळ्ये, संजय मुळ्ये, संकेत देसाई, संदीप पेठे, प्रतिक देसाई, बंटी सुर्वे ,उदय देसाई यांच्यासह कोल्हापूर गोकुळ दूध संस्थेचे दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील, सिनियर विस्तार सुपरवायझर (गोगवे चिलिंग सेंटरचे) दिलीप गवळी, उत्तम पाटील, शिवाजी पाटील यांसह दूध उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
गोकुळ दूध शीतकरण केंद्र जाकादेवी-आगवे या ठिकाणी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या संस्थेकडे जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादकांनी या संस्थेकडे दूध संकलित करून चांगल्या पद्धतीचे सहकार्य दिले आहे. कोकणामध्ये सहकार रुजावा यासाठी पर्शुराम दूध उत्पादक जाकादेवी संस्थेचे विद्यमान धडाडीचे व जिद्दी चेअरमन सुधीरशेठ देसाई यांनी या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी दूध उत्पादकांमध्ये त्यांनी रोजगाराच्या दृष्टीने प्रभावीपणे जनजागृती केली. सुधीरशेठ देसाई यांनी शेतकऱ्यांना दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून दूध उत्पादकांना मनापासून प्रोत्साहित केले.त्यामुळे सुधीर देसाई यांच्या सहकार चळवळीचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. सुधीर देसाई यांनी आपल्या दूध संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्याचे काम केले आहे. कोकणामध्ये सहकार रुजविण्यासाठी अतिशय धाडसी व चांगल्या प्रकारचा दूध शीतकरण संकलन केंद्राचा अनुकरणीय व स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या पर्शुराम दूध उत्पादक जाकादेवी या संस्थेचे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय मनापासून अभिनंदन केले.
गावोगावी दूध सहकारी संस्था काढण्याविषयीचे देखील आवाहन सुधीरशेठ देसाई यांनी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला केले आहे.या जाकादेवी येथील शीतकरण केंद्रामध्ये दररोज १० हजार लिटर दूध संकलित करण्याचा संकल्प या पर्शुराम दूध उत्पादक सहकारी संस्थेने केला आहे. सद्यस्थितीत या केंद्रातून दररोज सहा हजार लिटरपेक्षा जास्त दूध सिंधभूमी व गोकुळ दूध संस्था,कोल्हापूरकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते. तेथून दूध पॅकिंग करून रत्नागिरी जिल्ह्यातसह गोवा राज्यात वितरित केले जात आहे. शेतकऱ्यांना फॅटप्रमाणे चांगला मोबदला देणारी गोकुळ संस्था ही नावाजलेली संस्था असून जास्तीत जास्त शेतकरीवर्ग जाकादेवी येथील पर्शुराम दूध उत्पादक संस्थेकडे आकृष्ट झाला आहे.पर्शुराम दूध उत्पादक सहकारी संस्था या संस्थेला गोकुळ दूध संस्था कोल्हापूर यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याने भविष्यात पर्शुराम दूध उत्पादक संस्था जिल्ह्यामध्ये नावाजलेली दूध उत्पादक संस्था म्हणून ओळखले जाईल असा आशावाद गोकुळ दूध संस्थेचे वरिष्ठ विस्तार सुपरवायझर दिलीप गवळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
सुधीरशेठ देसाई यांनी बोलताना सांगितले की, पर्शुराम दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोकणातील शेतकऱ्यांना दूध उत्पादनाची चांगली सुवर्णसंधी या संस्थेने उपलब्ध करून दिले आहे, तसेच विशेषतः कोकणातील बेकार असलेल्या सुशिक्षित तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही दूध उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव प्रमोद देसाई यांनी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी,दूध उत्पादक संस्थांनी, दूध उत्पादक व्यक्तींनी पर्शुराम दूध उत्पादक संस्थेकडे अधिक माहितीसाठी- ९४२३२९२५९१, ९४०३८४५४५२ या नंबरवर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन जाकादेवी येथील पर्शुराम दूध उत्पादक सहकारी संस्थेने केले आहे.