(रत्नागिरी)
शहरातील आठवडा बाजार येथील जोशीला वाईन मार्ट बाहेर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई सोमवार, १७ जुलै रोजी रात्री ९.३० वा. करण्यात आली. अजित प्रभाकर नाचणकर (४६), रोहित शशिकांत बोकरकर (३१, दोन्ही रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सोमवारी रात्री शहर पोलिस आठवडा बाजार परिसरातून गस्त घालत असतान त्यांना हे दोघे जोशी वाईन मार्टच्या बाहेर बिअरच्या बाटल्या समोर ठेवून पिण्यासाठी बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.