(मुंबई)
रोग तपासणी निदान सेंटर चालवणाऱ्यांशी संगनमत करुन रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ११ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तब्बल २१ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
डायग्नोसिस सेंटर चालवणाऱ्यांशी संगनमत करुन रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ११ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तब्बल २१ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. या साठी त्यांनी डायग्नोसिस सेंटर चालवणाऱ्यांशी संगनमत देखील केले होते. दरम्यान, ही बाब रुगणालय प्रशासनाच्या लक्षात आली. याची चौकशी केली असता यात तब्बल २१ कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांत त्यांची तक्रार करण्यात आली असून २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ११ आरोप कर्मचाऱ्यांना भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
मुंबईतील परळ या ठिकाणी असणाऱ्या टाटा मेमोरियल रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे एक मोठे रॅकेट समोर आले आहे. या रॅकेट मध्ये काम करणारे कर्मचारी काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटरच्या मालकांनी मिळून गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना लुबाडण्याचा उद्योग सुरू केला होता. रुग्णालयात विविध वैद्यकीय चाचण्या उपलब्ध असतांना येथील कर्मचारी केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कमिशनसाठी त्यांना खाजगी डायग्नोसिस सेंटरमध्ये चाचणी करण्यास लावून गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णाची तसेच शासनाची देखील लाखो रुपयांचे आर्थिक फसवणूक करीत होती.
एका गुप्त माहितीच्या आधारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील सुरक्षा विभागाने, मुंबई पोलिसांच्या मदतीने रूग्णांना कमिशनसाठी बाहेरील इमेजिंग सेंटरमध्ये पाठवण्यात गुंतलेल्या हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांना पकडले. परळ येथील डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रतिनिधीकडून पैसे वसूल करताना दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे का, याचा तपास सुरू आहे. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “प्रशासनाने वेगाने आणि निर्णायकपणे काम केले आणि त्यांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आरोप सिद्ध झाल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येईल.”
याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात भा दं वि कलम 409, 406, 420 आणि 120(ब) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.