(रायगड)
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून ठिकठिकाणचे धबेधबे प्रवाहित झाले आहेत. वर्षा पर्यटनासाठी धबधब्यांवर गर्दी होत असून या दरम्यान अनेक अपघातही घडत आहे. सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. गटारीचं सेलिब्रेशन करणं दोन सख्ख्या भावांच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे. अलिबाग तालुक्यातील थेरोंडे येथील दोन भावांचा पेण तालुक्यातील पाबळ विभागातील कोंडवे धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे.
इलान बेंजामिन वासकर (वय २५) आणि इजराईल बेंजामिन वासकर (२३) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघं भाऊ पेण तालुक्यातील पाबळ विभागातील कोंडवे धबधब्यावर गटारी साजरी करण्यासाठी गेले होते, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते वाहून गेले. दोघांचे मृतदेह सापडला असून पेण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.