(राजापूर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सेवा, त्याग आणि निष्ठा ही मार्गदर्शक तत्त्वे डोळ्यासमोर ठेवून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र मोदीजींनी दिला. अनेक लोककल्याणकारी योजना या कालखंडात जनतेला मिळाल्या. या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पहिल्या टप्प्यात मोदीजींना जनधन सारखी योजना कार्यान्वित केली. आरोग्यविषयक विमा योजना सुरु केली. कामगार व महिला विषयक अनेक योजनांना नव्याने चालना दिली. इतकेच नव्हे तर ‘गरिबी हटाव’ हा गेली कित्येक दशकांचा काँग्रेसचा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर पावले उचलली.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत या सरकारने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. आयआयटी, एम्स अत्याधुनिक विमानतळे, अत्याधुनिक रेल्वे स्थानके आदींच्या माध्यमातून भारताचे सुधारलेले रहाणीमान प्रतिबिंबित होत आहे. संरक्षण विषयक भारताची नीती कमालीची आक्रमक झाली असून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारत आता घरात घुसून मारण्याची क्षमता ठेऊन आहे असा संदेश घुसखोरांना देण्यात यशस्वी ठरला आहे. काश्मीर मधील कलम ३७० असो व मुस्लीम भगिनींचा ट्रिपल तलाक सारखा संवेदनशील विषय असो या सर्वांना अत्यंत सहिष्णुतेने सोडवले आहे. मोदी@९ अभियान राबवताना भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या गोष्टी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना सांगितल्या. सोबतच अनेक प्रमुख योजनांची माहिती असणारे पत्रक वाटले. लोकांनीही या सर्व गोष्टी समजून घेत मोदी सरकारच्या सुशासन काळाला सहर्ष पाठींबा देण्यासाठी ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल दिला.
टिफिन बैठकीच्या निमित्ताने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेचे पदाधिकारी कुलकर्णी-काळे छात्रालय सभागृह, लांजा येथे एकत्र आले होते. यादरम्यान मोदी@९ अभियानाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांची देवाणघेवाण झाली. प्रत्येक कार्यकर्त्याने अभियानातील आपल्या कामकाजाचा आढावा विधानसभा क्षेत्रप्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांना दिला. योगदिन, संपर्क से समर्थन, घर घर चलो, पत्रकार परिषद आदी कार्यक्रमांसोबतच ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, सोशल मिडिया इन्फ्ल्यूएंसर संमेलन, व्यापारी संमेलन, राजापूर येथील जाहीर सभा या सर्व सभांचे आयोजन उत्तम झाल्याने सौ. विश्वासराव यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या संबोधनात त्या म्हणाल्या, “मोदीजींनी ९ वर्षांत केलेले कामकाज इतके प्रचंड आहे की केवळ एक महिन्यात आपण ते लोकांपर्यंत पोचवू शकत नाही. तरीही आपण सर्वांनी आपल्या नित्य दिनक्रमातून वेळ काढून हे अभियान यशस्वीपणे राबवले याबद्दल क्षेत्रप्रमुख म्हणून मी अभिनंदन करते. आपल्या सर्वांवर मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बघायचे आहे. त्यामुळे आज या अभियानाचा पूर्णविराम नाही हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे. उद्या पुन्हा नव्या जोमाने, नव्या उर्जेने आणि नव्या उत्साहाने आपल्याला कामाला सुरवात करायची आहे.”
यावेळी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, भाजपा रत्नागिरी (द.) उपाध्यक्ष श्री. रविंद्र नागरेकर, लांजा तालुकाध्यक्ष श्री. महेश (मुन्ना) खामकर, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, माजी राजापूर तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत लिंगायत, माजी लांजा तालुकाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस श्री. विजय कुरूप, माजी राजापूर तालुकाध्यक्ष श्री. अनिल करंगुटकर, संगमेश्वर भाजपा संघटन सरचिटणीस श्री. अमित केतकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. अमजदभाई बोरकर, लांजा नगरपंचायत नगरसेवक श्री. मंगेश लांजेकर, श्री, शेखर सावंत, श्री. संजयराव यादव, नगरसेविका लांजा सौ. शीतल सावंत, नगरसेविका राजापूर सौ. शीतल पटेल, माजी तालुकाध्यक्ष लांजा यु. मो. श्री. महेश बामणे, प्रदेश सदस्य श्री. भाई जाधव, राजापूर शहर सरचिटणीस श्री. स्वप्नील गोठणकर, अनु. जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री. मारुती कांबळे, श्री. रमाकांत सावंत, सौ. स्नेहल सावंत, श्री बाबूशेठ गांधी, श्री. सुरेशशेठ गांधी, श्री. विजय गांधी, श्री. विराज हरमले, श्री. रोहिदास राणे, श्री. राजाराम कदम, श्री. मंगेश भोसले, श्री. फैय्याज नळेकर, श्री. प्रशांत जाधव, श्री. धर्मराज साळवी, श्री. दिलीप पारकर, श्री. मयुर शेडे, श्री. शेखर सावंत, श्री. मधुकर आठल्ये, श्री. भास्कर सुतार, श्री. विश्वजीत जेधे, श्री. सुधाकर शेट्ये आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.