रत्नागिरी : १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ७ ऑक्टोबर पर्यंत सेवाकार्य अभियान भारतीय जनता पार्टी सर्व बूथ स्तरापर्यंत राबवत आहे. उद्या म्हणजे ७ ऑक्टोबर हा या अभियानाचा अंतिम दिवस आहे. या दिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी लाभार्थींची पोस्टकार्ड पाठवली जात आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता फक्त एक दिवस राहिला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या बूथपरिसरातील लाभार्थ्यांची पत्रं घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावाती, असे आवाहन भाजपा. रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाध्यक्ष पटवर्धन बोलत होते.
ते म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपल्या बुथपर्यंत किमान 20 लाभार्थींपर्यंत पोहोचावे. त्या लाभार्थींना प्राप्त झालेल्या लाभ योजनेसंदर्भात त्यांच्याजवळ चर्चा करून हा लाभ प्राप्त झाला, त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल लाभार्थींच्या भावना जाणून घ्याव्यात. तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना धन्यवाद देणारे घ्यावे व ते पाठवावे.
शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, मातृ वंदना योजना, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, आरोग्य संदर्भातील योजना, कोरोना मोफत लसीकरण, पंतप्रधान आवास योजना इत्यादी अनेक याेजनांचे लाभार्थी आपल्या आसपास आहेत. कार्यकर्त्यांनी किमान १० लाभार्थ्यांची पत्रं पाठवावीत, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांशी बोलताना अॅड. पटवर्धन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने जनसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचला आहे का? हे जाणून घेण्यासाठी मोदीजींचे दूत म्हणून कार्यरत व्हाल, असा विश्वास आहे.
या बाबत आज जिल्ह्याची ऑनलाईन बैठक झाली. त्या मध्ये राजेश सावंत, सचिन वहाळकर, बाबा परुळेकर, अभिजित गुरव, मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, ऐश्वर्या जठार यांचेसह बहुसंख्येने जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठकीस उपस्थित होते. धन्यवाद मोदीजी हा पत्र उपक्रम मोठ्या प्रतिसादात पार पाडण्याचे उद्दिष्ट बैठकीत रुपरेषेसह ठरले.