(रत्नागिरी)
महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर दै. ‘पुढारी’ रत्नागिरी आवृत्तीच्या प्रतिनिधी जान्हवी पाटील यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. जान्हवी विनोद पाटील या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा असून, रत्नागिरी जिल्ह्यात दैनिक पुढारीच्या प्रतिनिधी म्हणून त्या काम करतात. याशिवाय शासनाच्या वन स्टॉप सखी सेंटर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणावर अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे.
या त्यांच्या पत्रकारितेतील त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना तीनवेळा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.