(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथे असलेल्या जे.के.फाईल कंपनी बंद होण्याच्या मार्गांवर असुन येतील शेकडो कामगारांचा रोजगाराचा ऐरणीवर आला आहे. याबाबत महाराष्ट्रचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली असुन आमच्या शेकडो कामगाराचा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरच असुन तेच आम्हांला न्याय मिळवून देतील आणि तेच आमच्या पाठीमागे भक्कम पणे उभे असल्याचे लेखी पत्रक काढत कामगारांच्या नावाने लावलेल्या अफवांना पूर्ण विराम दिला आहे.
नुकत्याच कामगारांच्या नावाने जखमेवर मीठ चोळण्यासाठी खोट्या अफ़वा पसरवत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या बातम्याचे जे के फाईलच्या कामगारणी एकत्र येत निषेध केला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री आहे, पण ते अगोदर आमचे पालक असुन ते कामगारांच्या बाजूने असुन आम्हांला शेकडो लोकांच्या कुटुंबांना उघड्यावर सोडणार नसल्याचा विश्वास कामगारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आमच्या नावाने खोट्या माहितीच्या आधारे अफवा पसरवून आगीत तेल ओतण्याचे काम काही लोक करत आहेत. अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आहवानही कामगारांनी केले आहे. एक लेखी पत्रक काढून कामगारांनी ना.उदयजी सामंत यांना पाठींबा देत जे. के. फाईल कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.