(देवरुख / वार्ताहर)
शहरातील एचडीएफसी बॅक शाखेच्यावतीने शेतकरी सन्मान सोहळा संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे ग्रामपंचायतीत नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात बँकेचे शाखा व्यवस्थापक इकबाल इनामदार आणि निनाद घडशी यांनी बँकेच्या विविध शेतकऱ्यांसाठी असलेल्या कर्जविषयक योजनांची माहिती दिली. महेंद्र घुगे तसेच संगमेश्वर तालुका ऍग्रो स्टार फार्मस प्रोडूसर कंपनीचे चेअरमन संजय कांबळे व ताम्हणे गावचे सरपंच अमर सावंत आदी मान्यवरानी या सोहळ्यास उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
उपस्थितांनी बँकेच्या कामाचे व उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये प्रगतीशील शेततकरी यशवंत प्रभावलकर, संतोष कुळे, संदीप वेल्हाळ, बाळकृष्ण लिंगायत या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन एचडीएफसी च्या वतीने गौरविण्यात आला. शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. इनामदार यांनी नमूद करुन उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
फोटो – एचडीएफसी बॅंकेतर्फे शेतकरी यांचा सन्मान करताना शाखा व्यवस्थापक इकबाल इनामदार, निनाद घडशी आदी.