(संगमेश्वर)
राजापूर – लांजा – साखरप्याचे शिवसेनेचे आमदार डॉ राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त साखरपा येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा पुरुष व महिला गटात संपन्न झाल्या. यावेळी महिला गटात शंभर स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर पुरुष गटात तीनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यावेळी मुलींच्या गटात प्रमिला पांडुरंग पाटील चिपळूण, हुमेश हुमायून सय्यद डेरवण, अनुजा निलेश पवार डेरवणया अनुक्रमे प्रथम तीन आल्या तर उत्तेजनार्थ साक्षी पवार चिपळूण हिला देण्यात आले तर पुरुष गटात अंकित कुमार हरियाणा, सुमित्रा राठी हरियाणा, युवराज वाकसे कोल्हापूर हे अनुक्रमे प्रथम तीन आले तर उत्तेजनार्थ रोहन चौधरी पालघर या सर्व विजेत्यांना आमदार राजन साळवी यांच्या हस्ते रोख रक्कम सन्मान चिन्ह शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
यावेळी दाभोळे जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, साखरपा परिसरातील सर्व डॉक्टर, साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, माजी सैनिक, कोंडगाव साखरपा येथील सर्व रिक्षा व्यवसायिक, पत्रकार, दहावी बारावीचे प्रथम तीन विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका अशा सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन राजापूर लांजा साखरपा क्षेत्र प्रमुख जयसिंग माने यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवा सेना केले होते. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके,राजेंद्र महाडिक,माजी सभापती जयसिंग माने शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, युवा सेनेचे जिल्हा समन्वय दुर्गेश साळवी, उपतालुका प्रमुख काका कोलते,रजनी चिंगळे,पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, दत्ता घुमे, शेखर आकटे,बापू शिंदे अजय सावंत, महेश सावंत, रवी सावंत, मंगेश दळवी, योजना लोटनकर, प्रवीण जोयशी, केतन दुधाने, लक्ष्मण कदम, कुणाल शिंदे, भरत माने,सिद्धू पावसकर,पारस साखरे, सूरज मांडवकर, कमलेश महावळनकर, सुरेश कटम, अजिंक्य किर, दत्ता वागधरे, सुमित वागधरे,राज सावंत,केतन सावंत, ओंकार सुर्वे, प्रथमेश सुर्वे, कृष्णा सकपाळ,सुरज माने,रवी कामेरकर,लक्ष्मण शिंदे,दीपक गोवरे, विनायक गोवरे,सचिन अंकुशराव, सूरज लिंगायत, रुचीका जाधव, प्रियांका जोयशी, मंदार आठल्ये, हर्षा आठल्ये, संतोष पांगळे, सनीत गांधी, जनक जागूष्टे, राजू जाधव,प्रमिला चव्हान,अनंत बसवनकर,विजय कांबळे, दिनेश कांबळे,प्रशांत अडबल आदी शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते.