(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना आवश्यक आहे. जेणेकरून आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे या विषयाचे महत्व ओळखून गावडे आंबेरे येथील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन, सर्वोदय मच्छिमार सेवा सहकारी संस्था, समर्थ साई मच्छिमार सेवा सहकारी संस्था , शिवसागर मच्छिमार सेवा सहकारी संस्था, सागरी मच्छिमार संघटना व नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम गावडे आंबेरे येथे आयोजित करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे श्री चिन्मय जोशी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, गट अपघात विमा, सिंधुरत्न योजना इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्व क्रियाशील मासेमारी गट अपघात विम्याचे महत्व सांगून, या विम्यासाठी लागणारी माहिती मत्स्य विभागाकडे तत्काळ देण्यात येईल असे ही सांगितले. या कार्यक्रमास सर्वोदय संस्थापकीय अध्यक्ष यशवंत डोर्लेकर, सर्वोदय संस्थेचे चेअरमन वसंत नाटेकर, समर्थ साई संस्थेचे चेअरमन ओंकार खडपे, शिवसागर संस्थेचे सचिव अविनाश डोर्लेकर, सागरी मच्छिमार संघटनेचे कार्यकर्ते संजय बुवा डोर्लेकर सरपंच लक्ष्मण सारंग, उपसरपंच वैभव नाटेकर माजी सरपंच रामचंद्र आंबेरकर नारायण मिरजुळकर, जयदास मिरजुळकर, गणेश आडवीरकर, संतोष डोर्लेकर, निलेश डोर्लेकर, एकता मंच कार्यकर्ते, मच्छिमार व महीला, मत्स्य विभागाचे सागर मित्र उपस्थित होते. मच्छिमारांच्या सागरी सुरक्षेचे प्रशिक्षणास उत्स्फूर्त सहभाग लाभला.