(चिपळूण)
शहरालगतच्या कापसाळ येथून एकाची तीन लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. विमा पॉलिसी सरेंडर करून देतो, असे सांगून फोन केला व त्यानंतर संबंधिताच्या खात्यातून २ लाख ९७ हजार ९९९ रूपये संमतीशिवाय काढल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ४ जुलै रोजी सायंकाळी ८. १५ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ रोजी रात्री आपण मॅक्स लाईफ • इन्शुरन्स कंपनीतून बोलत आहोत. पॉलिसी सरेंडर करून क्सीस बँकेच्या खात्यात पैसे डिपॉझिट करतो असे सांगितले आणि सर्व माहिती घेऊन त्यांच्या क्सीस बँकेच्या खात्यातून २ लाख ९७ हजार ९९९ रूपये परस्पर काढले. त्यामुळे संबंधिताची फसवणूक झाली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.