(रत्नागिरी)
पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात होऊन बेशुध्द अवस्थे पडलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवार, ४ जुलै रोजी सायंकाळी ६.२० वा. मृत्यू झाला. राजेंद्र श्रीकांत मुंगळी (वय ४५, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
शनिवार, १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. राजेंद्र मुंगळी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन बाहेर गेले होते. त्यानंतर ते पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इटलादेवी स्टॉप रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसून आले. तेथील ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी सायंकाळी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबतचा अधिक तपास पोलिस कर्मचारी करत आहेत.