(राजापूर)
शहरातील नामांकित पवार इलेक्ट्रॉनिक दुकानाला बुधवारी (दिनांक ५ जुलै २०२३ ) मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागल्याचे समजते. अचानक लागलेल्या आगीत पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि लगत असलेल्या दुकानाला ही आग लागल्याचे वृत्त आहे. मध्यरात्री आगीचे तांडव थैमान घालत होते. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली असून दोन्हीं दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरीक आणि प्रशासन यांच्या शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल एक ते दीड तासांनंतर आग आटोक्यात आली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही मात्र मध्यरात्री ही प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू होते.