(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आरोग्य हे बहुमोलाचे आहे, त्यास आपण जपले पाहिजे आणि तंबाखूजन्य पदार्थांसह अन्य अमली पदार्थांना नाकारले पाहिजे त्याऐवजी पौष्टिक अन्न घेऊन जीवन आनंदाने जगले पाहिजे. आरोग्याला जपावे तंबाखूला नाकारावे, अमली पदार्थांना नकारावे असे मत डॉक्टर सतीश शिरसाठ यांनी व्यक्त केले . सलाम मुंबई व मायबाप बालसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात 29 मे ते 29 जून या कालावधीत व्यसनमुक्ती कार्यमास आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
तंबाखूजन्य पदार्थ व अन्य अमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होत आहेत अनेकांचे जीवन अर्ध्यावरच संपुष्टात येत आहे. दरवर्षी जगभरात अब्जावधी लोक जीवनास मुकत आहेत तर भारतात 15 लाखांपेक्षा अधिक लोक दरवर्षी केवळ तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. तंबाखू सेवन व उत्पादनामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे ही धोक्याची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) म्हणून कार्य करत असताना गावातील प्रमाण देखील याबाबत चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले एमबीबीएस फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक ऍड प्रशांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दोन्ही फाऊंडेशनच्या कार्यास शुभेच्छा देत त्यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉक्टर शैलेश गावंडे, यश फाउंडेशनच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रेरणा वजे, सिव्हिल मानसोचार विभागाच्या सौ स्मिता गोठणकर, एमबीबीएस फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशनच्या समन्वयक प्राध्या. कविता जाधव यांच्यासह फाउंडेशनच्या स्पर्धा विभागाचे प्रमुख हरेश गावडे, सांस्कृतिक विभागाच्या करुणा कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणा वझे तर आभार प्रदर्शन नर्सिंग विद्यार्थिनी प्रमुख सुर्वे हिने केले. तंबाखू मुक्ती व अमली पदार्थविरोधी शपथ घेउन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.