(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये मुंबई येथील प्रसिद्ध भुल तज्ज्ञ डॉ स्वाती गाडगीळ यांचे व्यसनमुक्ती आणि आरोग्य यावर दि. 30 रोजी सकाळी11 वाजता ऑनलाईन व्याख्यान पार पडले. बदलत्या जीवन शैली मध्ये वयस्कर माणसे तसेच शाळेतील विद्यार्थी देखील नकळतपणे व फॅशन म्हणुन व्यसनाच्या आहारी जात आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे असाध्य आजार होत आहेत त्यामुळे तरुणाईने याकडे दुर्लक्ष केले पाहिजे व आपलं आरोग्य निरोगी राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेल्थ इज वेल्थ हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला व आपले शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा,त्यासाठी व्यायाम करणे, प्राणायाम करा, कायम जागरूक राहा हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. या ऑनलाईन व्याख्यानाला प्रशालेतील इयत्ता 5 वि ते इयत्ता 12 वि चे विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बिपीन परकर, पर्यवेक्षक श्री नितिन मोरे उपस्थित होते, या ऑनलाईन व्याख्याना साठी श्री शिशिर अंबेकर व बाबासो बेडक्याळे यांनी महत्त्वाची सर्व व्यवस्था केली,