(रत्नागिरी)
आर्थिक देवाण घेवाणवरून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात घुसून दोघांवर झुंडीने हल्ला करण्याचा प्रकार १८ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास घडला होता. या प्रकरणातील संशयित एकूण पाच जण अटकेत होते. संशयित तिघांची न्यायालयाने जामिनावर शुक्रवारी सुटका केली.
हर्षद पापय धूळप, अमेय मसुरकर आणि आशिष सावंत हे तिघे परस्पर न्यायालयात हजर झाले होते. तर अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात सोमवारी हजर झालेल्या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आता या तिघांची न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर शुक्रवारी सुटका केली आहे. तर सुमित शिवलकर आणि अभिषेक पांचाळ या दोघांना आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.