(खेड)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे खेड शहर पदी श्री. ऋषिकेश मनोहर कानडे व तालुका सचिव पदी श्री. निलेश बामणे यांची निवड करण्यात आली. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रक सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी नेते तथा मा. आमदार श्री. नितीन सरदेसाई, नेते शिरीष सावंत, नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, उपाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर, सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, तालुका प्रवक्ते संभाजी देवकाते, भूषण मानकामे, ठाणे शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख धिरज पावसकर, उप प्रसिध्दी माध्यम प्रमुख सर्वेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.