(मुंबई)
मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शेजारील मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून माय-लेकीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर तीची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जोडप्यांना अटक केली आहे.
देवनार पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्णा पवार या व्यक्तीचा भाऊ घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडला राहतो, त्याचा मंगळवारी मृत्यू झाला त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कारही पार पडले. तक्रारदार भोसले यांचे कुटुंब मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शेजारीच राहतात, पण ते मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत. याचा राग मनात धरुन कृष्णा पवार याने अंजली भोसले यांच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी अंजली यांच्या बहिणीने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण चिडलेल्या कृष्णाने तिला धारदार चाकूने अनेकदा भोसकल. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई यामध्ये गंभीर जखमी झाली आहे.