[ चिपळूण ]
कोकण रेल्वे हिंद मजदूर युनियन किसान पंचायतचे राष्ट्रीय महामंत्री के.आर.सी.एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी,हिंद मजदूर किसान पंचायत महाराष्ट्र सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांची कोंकण रेल्वे अन्याय निवारण अध्यक्ष शौकत मुकादम यांच्यासमवेत कोंकण रेल्वे प्रवासी,कामगार व रेल्वे संदर्भात विविध प्रश्नांवर सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यामधे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संघटना,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे.
भविष्यात कोकण रेल्वेचे मॉनिटायझेशन होण्याची भीती असल्याने याबाबतही सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरु आहे या चर्चेच्यावेळी मुकादम यांच्यासमवेत उपसरपंच गजानन महाडिक,भरारी पथकाचे विकास जोरवेकर उपस्थित होते.