(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत मठाकडे जाणाऱ्या रोडवर तसेच शहरातील नाईक फरशी येथील जुगार अड्ड्यांवर २६ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास धाड टाकून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शिरगाव येथे रमेश शिवराम कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कदम हे जुगाराचे साहित्य स्वतः जवळ बाळगून लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार अड्डा चालवित असताना मिळून आले. त्यांच्याकडून ५२२ रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच शहरालगतच्या नाईक फरशीजवळ अशाच पद्धतीने २६ रोजी रात्री ९.३० सुमारास जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या प्रकाश गंगाराम भैरवकर याच्यावर धाड टाकून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश भैरवकर हा जुगाराचे साहित्य स्वीकारून अड्डा चालवित होता. त्याच्याकडून ५५२ रुपये व साहित्य जप्त करण्यात आले आहे.