(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर कला वाणिज्य संयुक्त ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र अभ्यासावे छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी करावे असे प्रतिपादन प्रा. सुभाष रानमाळे यांनी केले.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन इयत्ता बारावीची विद्यार्थिनी सिद्धी गोताड हिच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिता पाटील यांनी केले तर आभार प्रा.मनस्वी जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनी साध्वी डांगे मधुमंजिरी खानविलकर, गुरव, सनगरे इत्यादी विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास प्रा.अनन्या पवार व शिक्षकेतर कर्मचारी श्री हरियाण व विद्यार्थी उपस्थित होते.