(रत्नागिरी)
रत्नागिरीत 33 वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा सुरू झाली असून, मारूती मंदिर येथील जिल्हा क्रिडा संकुलात आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी भेट देऊन कार्यक्रमाची पाहणी केली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, धुलीचंद मेश्राम, वेंकटेश्वरराव कररा, नीरज बोरसे, अजित घारगे, सतीश खेमसकर शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, उप जिल्हा प्रमुख राजन शेट्ये, युवा सेना तालुकाध्यक्ष तुषार साळवी, अभिजीत दुड्ये, नगर परिषदेचे माजी सभापती निमेश नायर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा सेना रत्नागिरीने 33 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि 9 वी ज्युनिअर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2023-24 या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज सोमवारपर्यंत (26 जून) ही स्पर्धा चालणार आहे. उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. जिल्हा क्रिडा संकुलात सुरू झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
दरम्यान नामदार उदयजी सामंत तसेच किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा जिल्ह्यात होत असून, खेळाडूंना यापुढे देखील लागेल ते सहकार्य करण्यार असल्याचा शब्द पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिला आहे. या स्पर्धेचा आदर्श महाराष्ट्र मधील इतर जिल्ह्यानी घ्यावा असे आवाहन यावेळेळी पालकमंत्री यांनी केले आहे.