(लांजा)
राजापूर शहरातील तालिमखाना येथील रहिवासी व लांजा एसटी आगारातील तांत्रिक कार्यशाळेतील कर्मचारी अमोल अनंत बावधनकर (वय ४३) यांनी आपले राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बावधनकर हे लांजा एसटी आगारात तांत्रिक कार्यशाळेत कार्यरत होते. शुक्रवारी (ता. २३) दुपारी जेवून ते आपल्या घरी वरच्या मजल्यावर झोपले होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ते खाली न आल्याने त्यांच्या भावाने दरवाजा ठोठावून त्यांना हाक दिली; मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत गेले असता अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले