(रत्नागिरी)
शहरातील साळवीस्टॉप आणि मुरुगवाडा येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शनिवार, २४ जून रोजी सायंकाळी ४.३० ते ७.३० वा. कालावधीत करण्यात आली. शहबाज शब्बीर गावखडकर आणि सुभाष श्रीधर मयेकर (४५) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांची नावे आहेत. यातील शहबाज हा साळवी स्टॉप येथील पाण्याची टाकीजवळ तर सुभाष मयेकर हा मुरुगवाडा येथे पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीजवळ हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारू अधिनियम कायदा ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.