(चिपळूण)
चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जागृत श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट , चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे वार्षिक किरका ( जत्रा ) मिरवणूक बुधवार दि.५ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत चिपळूण शहराच्या चतु:सीमेत, सवाद्य फिरणार आहे.
श्री ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिरात दुपारी २:१५ वाजता किरकेचा मांड भरणे, धार्मिक विधी नंतर मंदिरातून दुपारी ३ वाजता किरका (जत्रा) मिरवणूक सवाद्य निघून चिपळूण शहराच्या चतुःसीमेत फिरल्यानंतर सायंकाळी ६ च्या दरम्यान श्री दत्त मंदिर, खेर्डी समोरील चिपळूण शहराच्या दक्षिण सीमेवर या किरका ( जत्रा ) मिरवणुकीची सांगता होईल, याची नोंद घेऊन देवस्थानचे समस्त मानकरी, सेवेकरी, भैरवसेवक, कार्यकर्ते आणि भक्तगण नागरिक यांनी भाविकपणे सहभागी व्हावे व आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
किरका ( जत्रा ) निमित्ताने श्री जुना काळभैरव देवस्थान संबधीत अशा चिपळूण शहरातील पारंपारिक मंदिरे , देवस्थाने, दर्गे, पीर आदींच्या गुरव, पुजारी, मुल्लाजी यांनी आपल्या देवस्थान, मंदिर, दर्गा, पीराचा नैवेद्य-शिधा मंगळवार दि.४ जुलै रोजी सकाळी १० ते १ या वेळेत श्री ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिरातून स्वीकारावा असे आवाहन श्रीग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विश्वस्त मंडळातर्फे प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकाअन्वये करण्यात आले आहे.