(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहेत. विकासकामांसाठी भरपूर भरघोस निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून दिला जात आहे. आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पण लक्ष देण्यासाठी थेट पालकमंत्री यांनी लक्ष वेधले असून रेशनकार्ड सारखा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश यांनी दिले आहेत.
तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये रेशनकार्डच्या छोट्याशा कामासाठीची तक्रार पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्याकडे येत असतात. यासाठी त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला बोलावून रेशन कार्डवर नाव चढवणे, नाव कमी करणे, त्याला पुरवणी लावणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. अशा छोट्या छोट्या कामासाठी लोकांना वेठीस न धरता तात्काळ त्यांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील लोकांना रेशन कार्ड संदर्भात त्रास झाला आणि याबाबत तक्रार आल्यास मी त्या संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. नव्याने हजर झालेले रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडून यासंदर्भात चांगलीच उपाययोजना केली जात असून त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असून लोकांनी अडचण निर्माण झाल्यास स्वतः माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन यावेळी तहसीलदार रत्नागिरी यांनी केले आहे.
संबंधित विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी पालकमंत्रीकडे सादर; तर प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीर
रेशन कार्ड हा लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्या ठिकाणी लोकांना अडथळे निर्माण करणार असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी पालकमंत्री यांच्याकडे गेली असून अशा कर्मचाऱ्यांना योग्य त्या पद्धतीने कारवाईला सामोरे जावे लागणार असून लोकांना आस्थेने मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागे मी खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री यांनी आवर्जून सांगितले.