(मुंबई)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी भाविकांसाठी रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. नियमित गाड्यांच्या आरक्षणाचा प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्यरेल्वेने या मार्गावर एक दोन नाही तर तब्बल १५६ अतिरिक्त फेऱ्या विशेष शुल्कासह चालवणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २७ जून रोजी खुले होणार आहे अशी माहित रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
१) मुंबई-सावंतवाडी रोड दैनिक विशेष (४० फेऱ्या)
०११७१ मुंबई सावंतवाडी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३.०९.२०२३ ते ०२.१०.२०२३ (२० फेऱ्या) पर्यंत दररोज ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
०११७२ सावंतवाडी मुंबई विशेष सावंतवाडी रोडवरून १३.०९.२०२३ ते ०२.१०.२०२३ (२० फेऱ्या) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
संरचना: १८ शयनयान, १ गार्ड व ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
२. लो.टि.ट.-कुडाळ-लो.टि.ट विशेष (२४ फेऱ्या)
०११६७ लो.टि.ट कुडाळ १३, १४, १९, २०, २१, २४, २५, २६, २७, २७ सप्टेंबर रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि ऑक्टोबरमध्ये १.१० आणि २.१०.२०२३ रोजी (१२ फेऱ्या) आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी ०९:०० वाजता पोहोचेल.
०११६८ कुडाळ लो.टि.ट विशेष कुडाळ येथून १४, १५, २०, २१, २२, २५, २६, २७, २८, २९ आणि ऑक्टोबर २ आणि ३ मध्ये सकाळी १०:३० वाजता सुटेल. (१२ फेऱ्या) त्याच दिवशी २१:५५ वाजता लो.टि.ट येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.
संरचना: १ – वातानुकूलित २ टियर, २- वातानुकूलित ३ टियर, १०- शयनयान, २ गार्ड व ब्रेक व्हॅनसह, ७ सामान्य द्वितीय श्रेणी.
३. पुणे-करमळी/कुडाळ -पुणे विशेष (6 फेऱ्या)
०११६९ पुणे करमळी विशेष गाडी १५.०९.२०२३, २२.०९.२०२३ आणि २९.०९.२०२३ रोजी पुण्याहून १८.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता करमळी येथे पोहोचेल.
०११७० कुडाळ पुणे विशेष कुडाळहून १७.०९.२०२३, २४.०९.२०२३ आणि ०१.१०.२०२३ रोजी १६.०५ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
थांबे: लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.
संरचना: १- वातानुकूलित २ टियर, ४ – वातानुकूलित ३ टियर, ११ शयनयान, २ गार्ड व ब्रेक व्हॅनसह, ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
४. करमळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक)- (६ फेऱ्या)
०११८७ करमळी पनवेल विशेष १६.०९.२०२३, २३.०९.२०२३ आणि ३०.०९.२०२३ (३ फेऱ्या) रोजी करमळी येथून १४.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पनवेलला पोहोचेल.
०११८८ पनवेल कुडाळ विशेष पनवेलहून १७.०९.२०२३, २४.०९.२०२३ आणि ०१.१०.२०२३ (३ फेऱ्या) रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता कुडाळला पोहोचेल.
थांबे: थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा .
०११६९ पुणे करमळी आणि ०११८७ करमळी पनवेल विशेष गाड्या कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी येथे थांबतील
संरचना: १- वातानुकूलित २ टियर, ४ वातानुकूलित ३ टियर, ११ शयनयान, २ गार्ड व ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
५. दिवा -रत्नागिरी मेमू विशेष (दैनिक) (40 फेऱ्या)
०११५३ दिवा रत्नागिरी विशेष दिवा येथून १३.०९.२०२३ ते ०२.१०.२०२३ (२० फेऱ्या) दरम्यान ०७.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
०११५४ रत्नागिरी दिवा विशेष गाडी १३.०९.२०२३ ते ०२.१०.२०२३ (२० फेऱ्या) दरम्यान १५.४० वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता दिवा येथे पोहोचेल.
थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
संरचना :- १२ मेमु डबे
६.मुंबई- मडगाव विशेष (दैनिक) ४० फेऱ्या
०११५१ मुंबई मडगाव विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३.०९.२०२३ ते ०२.१०.२०२३ (२० फेऱ्या) पर्यंत दररोज ११.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०२.१० वाजता मडगावला पोहोचेल.
०११५२ मडगाव मुंबई विशेष मडगावहून १३.०९.२०२३ ते ०२.१०.२०२३ (२० फेऱ्या) दररोज ०३.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १७.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
संरचना: १८ शयनयान, १ गार्ड व ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्क आकारून सर्व गणपती विशेष गाड्यांसाठी आरक्षण २७/०६/२०२३ रोजी उघडेल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.