(मुंबई)
शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख हे विभाग शेतकऱ्यांशी खूप निगडित असून शेतीच्या संबंधित असलेली सगळी कागदपत्रे किंवा शासकीय कामे या विभागाच्या अंतर्गत येतात. शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे किंवा शासकीय कामे त्याकरिता या दोन्ही विभागाच्या बऱ्याच सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. सातबारा उतारा संगणकृत करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा मिळतात.
सातबारा उतारा हा शेतकऱ्यांशी निगडित असलेले सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून तो मिळवण्यासाठी नागरिकांना तलाठी किंवा सेतू कार्यालयामध्ये बऱ्याचदा हेलपाटे मारावे लागतात. परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची गरज नसून आता डिजिटल सही असलेला सातबारा उतारा आता केंद्र सरकारच्या उमंग ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येणार आहे.
मोबाईल मधील उमंग ऍप वर मिळणार डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा
महसूल विभागाने संगणीकृत केलेला आणि महाभूमी या वेबसाईटवर सर्व नागरिकांना उपलब्ध असलेल्या डिजिटल पद्धतीचा सातबारा आता नागरिकांना केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना तलाठी किंवा सेतू कार्यालयांमध्ये सातबारा उताऱ्या करिता चकरा मारण्याची गरज राहणार नाही.
सातबारा किंवा ८ चा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता हा डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उतारा केंद्र सरकारच्या उमंग अॅपवर हातातील मोबाईलच्या साह्याने डाऊनलोड करता येणार असून यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु या सेवेकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये उमंग हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीने करा उमंग ॲप डाऊनलोड
उमंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी ज्या वापरकर्त्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे असे वापरकर्ते मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वर जाऊन उमंग ॲप डाऊनलोड करू शकतात. तसेच जे नागरिक आयफोन वापरतात असे नागरिक एप्पलच्या ॲप स्टोअरवरून उमंग एप्लीकेशन डाउनलोड करू शकतात.
हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचे खाते अर्थात अकाउंट तयार करणे गरजेचे असून अकाउंट तयार झाल्यानंतरच तुम्हाला लॉगिन करता येणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण करून सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे.
इतके लागेल शुल्क
याकरिता महसूल विभागाच्या महाभुमी संकेतस्थळावर सातबारा उतारा तसेच आठ अ चा उतारा उपलब्ध असून हे उतारे आता उमंग अॅप वर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. उमंग एप्लीकेशन वरून सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना पंधरा रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क भरण्यासाठी तुम्हाला दुसरे कुठे जाण्याची गरज नसून या एप्लीकेशनच्या मदतीने तुम्ही सरकारच्या ऑनलाईन खात्यामध्ये हे जमा करू शकतात.
शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
सातबारा उतारा आता केंद्र सरकारच्या उमंग ऍप वर उपलब्ध करून दिल्यामुळे आता तुम्ही कोणत्याही ठिकाणी आणि कुठेही तुमच्या मोबाईलवर सातबारा उतारा डाऊनलोड करू शकतात. विशेष म्हणजे मोबाईल मध्ये डाऊनलोड केलेला हा उतारा तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी पाठवू शकतात किंवा त्याची प्रिंट देखील घेऊ शकतात. त्यामुळे आता सातबारा साठी तलाठी कार्यालय किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाण्याची कटकट संपणार आहे.