(मंडणगड)
मंडणगड तालुक्यातील शेवरे गावचे सुपुत्र ज्येष्ठ व मुक्त पत्रकार, वृत्तपत्र लेखक दीपक महाडिक यांना कोकण दिप मासिकेचा “कोकण भूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार कोकण दिपच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार
दिनांक 25 जुन रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह शारदा सिनेमा जवळ दादर (पूर्व ) मुंबई येथे सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व इतर क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या समाज सेवकांनाही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळा शिवसेना दापोली संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम यांच्या समारंभाध्यक्षखाली होणार असून या पुरस्कार सोहळ्याला प्रकाश सालसिंगीकर (बॉम्बे विषेश हायकोर्ट सरकारी वकील महाराष्ट्र ), सुकृत खांडेकर (संपादक दै प्रहार ) अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये (रात्रीचे खेळ चाले सरिता) सिद्धी कामथ अभिनेत्री (बाळूमामाच्या नावानं चांगभलं) गिरणी कामगार नेते, प्रवीण घाग, राजेश सावंत उपसंपादक (दैनिक प्रहार) एकनाथ बिरवडकर (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ,) रणजित जाधव अध्यक्ष मराठा समाजन्नोती संघ, कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.