(मुंबई /प्रतिनिधी)
मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट ज्येष्ठ आमदार कालीदास कोळंबकर यांच्या पत्नी सौ. नम्रता कालीदास कोळंबकर( वय ६५) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आम. कोळंबकर यांच्या पत्नी असल्यातरी त्या मतदारसंघातील प्रत्येक वार्डातील महीला मंडळ, फेरीवाले, पोलिस वसाहत आदी भागातील सामान्यांच्या त्या आधारवड होत्या. कायम हसतमुख असलेल्या नम्रताताई भाईंकडे आलेल्या प्रत्येक सामान्यांची अडचणी समजून घेत असत. आलेल्या कार्यकर्त्याची जातीने चौकशी करून त्याला सांभाळून घेत मदत करत असत. अशा या मनमिळाऊ स्वभावाच्या ताईंच्या निधनाने सन्नाटा पसरला असून शोक व्यक्त होत आहे.
त्याचे पश्चात पती, २मुलगे नात असा परीवार आहे.
त्यांचेवर सायंकाळी वाजता वडाळा स्मशानमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.