( गुहागर )
तालुक्यातील देवघर येथील 7जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. देवघर येथील एका चायनिज सेंटरमध्ये चायनिज खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अन्न भेसळ विभागाकडे अधिक तपासासाठी अन्नाचे नमुने पाठवले आहेत.
आदित्य अजित गुजर (20), सोहम पवार (16), निशांत विनायक सकपाळ (16), साहिल शंकर राठोड (16), सागर संजय गुजर (24), संकेत संजय गुजर (22), श्रेयस सचिन चव्हाण (20, सर्व देवघर) अशी अन्नातून विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. त्यांना गुहागर ग्रामीण रूग्णालयामध्ये शुक्रवारी रात्री 9.30 वाजता दाखल करण्यात आले. मात्र उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयामधून सांगण्यात आले. मात्र या रूग्णांनी पोलिसांना तक्रार देण्यास नकार दिला, परंतु सातहीजणांच्या घेतलेल्या जबाबामध्ये देवघर येथीलच एका चायनिज सेंटरमध्ये चायनिज खाल्ल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांच्या विषबाधीत अन्नाचे नमुने घेऊन अन्न भेसळ प्रशासन विभागाकडे अधिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. तेथील तपासानंतरच नक्की कशामुळे विषबाधा झाली हे समजणार आहे.