(मुंबई)
सारेगमप लिटल चॅम्पसचं पहिलं पर्व खूपच गाजलं. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांच्या स्वरानी सगळ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. आता या पंचरत्नांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतात. कार्तिकीनं दोन वर्षांपूर्वी लग्न केलं, तर रोहीत राऊतनंही गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. तर आता वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.
या चर्चेला उधाण येण्याचं कारण म्हणजे, प्रथमेश लघाटेची नवीन पोस्ट. त्यानं मुग्धा वैशंपायन सोबत एक रोमॅन्टिक फोटो शेअर केलाय. या फोटोवरून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी दोघांचं अभिनंदन देखील केलं आहे. सारेगम लिटल चॅम्पचं पहिलं पर्व गाजवणारे मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. प्रथमेशनने त्याच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवरून ही प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि मुग्धा रोमँटिक पोझमध्ये उभे आहे. तसेच त्याने या फोटोला आमचं ठरलंय, असं कॅप्शन दिलं आहे.
गायक प्रथमेशने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सारेगम लिटल चॅम्पमधील कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत यांचं लग्न झालं आहे. तर आर्या आंबेकर सध्या करिअर फोकस करताना दिसत आहे. अशातच आता प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या या रोमँटिक फोटोवरूनही चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघांच्या प्रेमाच्या कबुलीनंतर आता दोघे लग्नबंधनात केव्हा अडकणार, यावरूनही चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.