(पाचल / तुषार पाचलकर)
पाचल – करक अर्जुना डॅममध्ये चार चाकी कॅम्परमधून अरगाव अर्जुना कॅनॉलमध्ये काम करणारे 10 कामगार धरणाच्या आतील बाजूला सदर पलटी होऊन त्यामध्ये दोन कामगार मृत्यूमुखी पडले. तर इतर 8 कामगार गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना काल बुधवार दिनांक 14 जून सायंकाळी 6:30 वाजता घडली आहे. अपघातग्रस्त वाहनाचा नंबर MH14 – JU 1359 असा असून या गाडीच्या चालकाने हॉस्पिटलमध्ये आमच्या प्रतिनिधीशी बोलताना हा थरारक प्रसंग कथन केला आहे.
या अपघातात सुदाम कुमार (वय 26) व बनई (वय 25) हे दोघे मयत झाले आहेत. तर सूर्यकुमार बिन(बिहार), उकाश कोरे (सांगली), समरपाल कस्य (मुरादाबाद), राहुल गणेशवाडे (मिरज), हिरांकुमार बिन, लहुकुमार बिन, दिपकुमार बिन, मक्सुदन हे आठ जण गंभीर आहेत.
जखमींची भेट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात राजापूर तहसीलदार शीतल जाधव तात्काळ दाखल झाल्या होत्या.