(खेड / इक्बाल जमादार )
खेड तालुक्यातील निळीक येथील प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तीमत्व अब्दुल हमीद महंमद ईसाक चौगले यांची नात कु. फराह उस्मान चौगले हिने “NEET 2023” या परीक्षेत 597 गुण मिळवुन ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव-खोंडे(खेड) या कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जमी जमात खेडच्यावतीने फराह व तिच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, सध्या खेडमध्ये महिला Gynecologistची कमतरता आहे. यावेळी फराहने फक्तं MBBS मध्येच शिक्षण न करता Gynecology क्षेत्रामध्ये शिक्षण पुर्ण करावे व खेड तालुक्यातील समाजाच्या सेवेसाठी रुजु व्हावे, अशी जमी जमात खेडमार्फत इच्छा व्यक्त करण्यात आली. तसेच जमी जमात खेडच्या वतीने फराहला सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जमी जमात खेडचे पदाधिकारी व निळीक मोहल्ल्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.