(नवी दिल्ली)
मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. कर्मचार्यांना तणावमुक्त करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी कामाच्या दरम्यान ‘योगा ब्रेक’ घेण्यास सांगितले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कामावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कार्मिक मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांना/विभागांना कामाच्या ठिकाणी हा नवीन योग प्रोटोकॉल स्वीकारण्याची सूचना दिली आहे. या कृतीला त्यांनी ‘वाय-ब्रेक’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ योगा ब्रेक असा असून तो काहीं मिनिटांसाठी असणार आहे. आयुष मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला आहे. जे कर्मचारी आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे बाहेर जाऊन योगा करू शकत नाहीत, त्यांना कार्यालयाचील खुर्चीवरच सोप्या पद्धतीने आसने, प्राणायाम आणि ध्यान करण्यास सांगितले आहे. वाय-ब्रेक हे तंत्र हे प्रख्यात तज्ञांनी अभ्यासपूर्वक तयार केले आहे. तो कसा करायचा याचे व्हिडीओही जारी करण्यात आले आहेत.