(चिपळूण)
कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव अशी धावणाऱ्या ‘वंदे ‘भारत’ एक्सप्रेसचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असून या संदर्भात होणाऱ्या उलटसुलट चर्चांना कोकण रेल्वेच्यावतीने पूर्णविराम देण्यात आला आहे.
मुंबई ते मडगाव या मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे वेळापत्रकं आठवडाभरात जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, खेड असे थांबे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला देण्यात आले आहेत. चिपळूण थांब्याबाबतचा निर्णय प्रलंबित असून याबाबत रेल्वेमंत्री अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेस रद्द झालेली नसून ती लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावेल, असे मुख्य कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. तर चिपळूणसाठी थांबा मिळावा यासाठी शौकत मुकादम यांचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.