(खेड / प्रतिनिधी)
तालुक्यातील धामणदेवी वसाहतीच्या पाठीमागील ताळीजवळ बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 3 लाख 27 हजार 136 रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी 17 जणांवर येथील पोलीस स्थानकात रविवारी रात्री 11.45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्तार रोशन धामसकर (56), जयवंत मनोहर उतेकर, असगर अली नाखुदा (50), तन्वीर अब्दुल रहिम घारे (44), अजित अशोक जाधव (50), विजय महादेव शिर्के (59), राजेंद्र रामांद्र आंब्रे (53), रूपेश रवींद्र काजवे (32), नथुराम बारकू दाभोळकर (50), सिकंदर उस्मान कडवेकर (47), अब्बास हुसेन वरवडकर (47), सुनिल कृष्णा कदम (51), पवीण पभाकर कदम (30), अविनाश सदाशिव आंब्रे (53), महेश मधुकर महाडिक (37), जनार्दन तुकाराम चाळके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
धामणदेवी येथील ताळीजवळ 17 जण स्वत:च्या फायद्याकरिता 13 पानी नॉकआऊट, 1010 पॉईंटचा रमी खेळ पैसे लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 17 जण रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणात 24 हजार 10 रूपयांच्या किंमतीसह 2 लाकडी टेबल, एक प्लास्टिक टेबल, 16 प्लास्टिक खुर्च्या, 3 पाण्याचे जार, एक फ्रिज, इतर जुगाराचे साहित्य असा 3 लाख 27 हजार 136 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.