( दापोली / प्रतिनिधी )
मुरुड येथील एका रिसॉर्टमध्ये काळजीवाहक आणि कामगाराला चारचाकीतून उतरलेल्या 7 जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवार 10 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव करुन मारहाण केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकम इम्यायल अनोलिक, विशाल शशिकांत पडळ, माधव मनोहर निलेवाड, कृष्णा मच्छिंद्रनाथ यडांयत, गिरीष मोहन चव्हाण, नितीन केदारी, मिखाईल गायकवाड (सर्व राहणार पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुरुड येथील सिल्वर सेंट ब्रिच रिसॉर्टचे केअर टेकर आहेत. 10 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातून चारचाकी गाडीतून आलेल्या 7 जणांनी दापोली रिसॉर्टमधील कामगाराला दमदाटी करुन शिवीगाळ केली. कर्मचारी विश्रांती रुममध्ये जबरदस्तीने घुसून रुमचा ताबा मिळवला. रुममधील सामानाची आदळआपट केअर टेकर आणि कामगाराला मारहाण केली. यातील विकम इम्यान्यल अनोलिक याने मी वकील असे म्हणत विश्रांती करत असलेल्या रुमवर कब्जा मिळवत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विक्रम इम्यायल अनोलिक, विशाल शशिकांत पडळ, माधव मनोहर निलेवाड, कृष्णा मच्छिंद्रनाथ यडांयत, गिरीष मोहन चव्हाण, नितीन केदारी, मिखाईल गायकवाड यांच्यावर भादविकलम 452, 143, 147, 149, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.