जगाच्या पाठीवर मराठी चित्रपटात आशाताईंच्या स्वरसाजाने मधाळ पणे मनामनात झिरपणारं हे गाणं. अगदी जुन्या काळच पण समजूतदार शब्दांचं असं हे गाणं. आपण पूर्ण शांत पणे हे गाणं डोळे बंद करून मनाने ऐकलं आणि त्यावर विचार करू लागलो तर त्या गाण्यातल्या काव्य आणि त्या काव्याच्या अर्थाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.
तुला पाहते रे,जरी आंधळी मी तुला पहाते,,, शब्द आपल्याला बरीच माहिती पुरवतात अंध स्त्री आहे आणि तिच्या मनःचक्षूंनी तीने आपल्या माणसाला समजून घेतले आहे, तुझ्या जगण्याचा मला ध्यास लागला आहे, मला दृष्टी नसली तरी मी तुझी मूर्त माझ्या काळजात जपली आहे. तुझ्या सुखाने मला आनंद होतो आणि तुझ्या दुःखाने मला व्याकुळ व्हायला होतं. या मधील भवनोत्कटता लक्षात येईल. भावनिक गुंतणे कबूल करीत आस दाखवून दिली जात आहे. मनोभावनांची गुंफण किती सुरेख रंगवली आहे.
मी तुला पाहू शकत नसेले तरीही तू मला समजतो आहेस याचे दाखले तर वास्तवातले पहा,,, नदी सागराला मिळते पण नदी सागराला कधी बघू शकत नाही तसेच भक्त ईश्वराला पाहू शकत नाही पण आपल्या परमेशवरचे चिंतन त्याच्या रूपानेच करतो. कोणाच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी तो आपल्याला दिसणे आवश्यक नाही. आता काव्यात आलेल्या गोष्टी समजून घेता केव्हढ्या अर्थाचं मानसशास्त्र सांगितलं आहे या लहान लहान शब्दातून ! यातील भौतिक भाग बाजूला केला तरी आपण अनुभवू शकतो,,, डोळे बंद केल्यावर आपण शांत चित्ताने असलो तर तेव्हा, काही आठवणी प्रसंग मनात येतात आणि ते समोर प्रत्यक्ष घडत नसूनही त्या प्रसंगात आपण जगल्या सारखे रमतो. अनुभवतो काही वेळानंतर आपल्याला जणू आपण इथेच काही घडताना पाहिल्या सारख जाणवतं कारण हा सर्व आपण घेतलेला अनुभव आपला अनुभव असतो. पूर्ण शुद्धीत तो भास होता हे कळतं.
आपण सर्वजण यासारखे अनुभव नेहमीच्या जीवनात अनुभवत असतो. खूप वेळा आपण सहज समोरच्याला म्हणतो,, बोल मी समजू शकते इतकं सहज भावाने सांगितलं आहे कवीने,,,एखादं न्यूनत्व असल्याने तुम्ही भावनिक दृष्ट्या अजिबात कमी असू शकत नाही. पंचेंद्रियांमधील एकाची कमतरता पूर्ण करण्यासाठी चित्त, मन हे सहावे इंद्रिय पूर्णत्व देते हे शिक्षण कदाचित कवीला करून द्यायचं असू शकतं. याचबरोबर दुसऱ्याला समजून घेण्यासाठी बाकी कशापेक्षाही सशक्त मनाची गरज असते. संवेदनात्मक मनाला सर्व स्पष्टपणे दिसण्याचं, जाणवण्याचं वरदान असतं! किती वर्षे हे गाणं आपल्या कानात आशाताईंच्या गळ्यातले आणि भाव आपल्या सर्वांच्या मनातले होऊन राहिले आहे…..
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !