( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील मेघी येथे नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडली. अभिषेक शेट्ये असे बुडून मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अभिषेक हा मित्रांसह दुपारी 3.30 वाजता बावनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी अभिषेक याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी अभिषेक याचा शोध लागला. त्याला देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषीत केले.