(मुंबई)
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमघ्ये मोठा बदल झाला आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगतापांना हटवले असून ही जबाबदारी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले..
भाई जगताप यांच्याजागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती.
काँग्रेसच्या नव्या मुंबई अध्यक्षा असणार वर्षा गायकवाड.@INCMaharashtra @IYCMaha pic.twitter.com/0bDyWU6IQw
— Krishna Sonarwadkar (@KrishnaSonarwa1) June 9, 2023
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आज पत्रक काढून या निवडीची घोषणा केली. तसेच गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची तर पुद्दुचेरी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, संघटनेत सर्वांना एकत्र घेऊन कसं जाता येईल, हे पाहाणार आहे. येणाऱ्या काळात माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न असेल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.