(चिपळूण / वार्ताहर)
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महा. राज्य चिपळूण तालुका कार्यकारिणी संघटनेच्यावतीने शासनाचा अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार प्राप्त सौ. एकता पेढांबकर, (पेढांबे -भराडे) सौ. समिधा भुवड, सौ.सुप्रिया शिंदे (कोळकेवाडी), सौ नेत्रा पाटील (अलोरे) या महिलांचा यथोचित सत्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महा. राज्य चिपळूण तालुका कार्यकारिणी संघटना वतीने करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, बुके व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त महिलांना मिळालेला पुरस्कार हा खरंच सर्व तालुक्यातील महिलांना आदर्श ठरेल. असे हे सत्कारमुर्ती आहेत. शैक्षणिक सामाजिक विविध उपक्रम राबवून समाजासाठी विधायक कार्य करण्याचं ध्येय या पुरस्कार प्राप्त महिलांनी स्वीकारलेला आहे. या सत्कारासाठी उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्ता, महासंघ महा. राज्य चिपळूण तालुका अध्यक्षा सौ. स्वाती हडकर, तालुका उपाध्यक्ष श्री. योगेश पेढांबकर, तालुका सचिव श्री. दीपक शिंदे, कार्यकारी प्रचार प्रमुख श्री. सुरेश खेडेकर, चिपळूण तालुका शहरअध्यक्षा सौ. शीतल भेकरे, चिपळूण तालुका मुख्य प्रचार प्रमुख सौ. मानसी मुदलीयार व इतर मान्यवर आदि उपस्थित होते.
सत्कारमूर्ती महिलांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आपण माहिती अधिकार कार्यकर्ता, महासंघ महाराष्ट्र राज्य. चिपळूण तालुका कार्यकारणी संघटनेने केलेला हा सत्कार कायम आमच्या लक्षात राहील. यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला असून आमचे बळ आणखी वाढले आहे. त्यांनी चिपळूण तालुका संघटनेसाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.