(रत्नागिरी)
नाणीज ग्रामपंचायतीतर्फे ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून ३०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची चांगली सोय झाली. एकाच दिवशी सर्व संबंधितांना दाखले मिळाले. सर्वांचाच वेळ वाचला.
यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पुरुषोत्तम सुर्वे, नाणीजचे सरपंच श्री. गौरव संसारे, उपसरपंच सौ संध्या गुरव, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक शिवगण, श्री. दत्ताराम शिवगण, सौ. पूजा पंडित, सौ. अनुजा सरफरे, सौ. संजना रेवाले, श्री. विजय गावडे, नाणे शिक्षण मंडळाचे सचिव सुधीर कांबळे, तलाठी श्री. चौघुले, ग्रामसेवक श्री. आशिष खोचाडे, रत्नागिरी सेतू येथील कर्मचारी, पोलिस पाटील श्री. नितीन कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष श्री. दत्ताराम खावडकर, माजी तहसीलदार एम. बी कांबळे, बचत गट महिला , सीआरपी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सर्वांनी दाखले देण्यासाठी सहकार्य केले. यावेळी नाणीज, खानु, कशेळी गावचे ग्रामस्थ, विद्यार्थी, तसेच कर्मचारी उपस्थित होते.