( नवी दिल्ली )
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स अहवालानुसार जगातील सर्वांत जास्त हवा प्रदूषण असणा-या २० शहरांपैकी भारतातील तब्बल १४ शहरांचा सामावेश आहे. हा भारतासाठी धोकायदायक इशारा असून महाराष्ट्रातील भिवंडी या शहराचा यामध्ये समावेश आहे. तसेच देशाची राजधानी दिल्ली शहरालाही प्रदूषणाने विळखा घातला आहे. यासोबतच पाकिस्तानातील तीन शहरांचा या यादीत समावेश आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही यादी प्रसिद्ध केली आहे.
हवा प्रदूषणात पहिल्या २० शहरांमध्ये पाकिस्तानातील लाहोर या शहराचा पहिला क्रमांक लागतो तर चीनमधील होटन या शहराचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडी आणि दिल्ली हे दोन शहरे अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत. जगातील आघाडीच्या २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील सर्वाधिक १४ शहरांचा समावेश आहे. ही सर्वांत जास्त चिंतेची बाब असून, भारतासाठी हा मोठा इशारा मानला जात आहे. अलिकडे भारतात प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळेच चिंता वाढली आहे. त्यात सर्वाधिक १४ भारतीय शहरे या यादीत आल्याने भारताला इतर समस्यांसोबत प्रदूषणाच्या समस्येचाही सामना करणअयाची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रदूषित २० शहरे
लाहोर (पाकिस्तान), होटन (चीन), भिवंडी (भारत), दिल्ली (भारत), पेशावर (पाकिस्तान), दरभंगा (भारत), असोपूर (भारत), एनजामेना (चाड), नवी दिल्ली (भारत), पाटणा (भारत), गाझियाबाद (भारत), धरुहेरा (भारत), बगदाद (इराक), छपरा (भारत), मुझफ्फरनगर (भारत), फैसलाबाद (भारत), ग्रेटर नोएडा (भारत), बहादूरगढ (भारत), फरीदाबाद (भारत), मुझफ्फरपूर (भारत).