(मुंबई)
मुंबईतील चर्चगेट परिसरातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात या तरुणीचा मृतदेह आढळला. तिच्या खोलीला बाहेरून कुलूप होते आणि गळ्यात स्कार्फ बांधलेल्या अवस्थेत ती मृतावस्थेत आढळली. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही तरुणी विदर्भातील अकोल्याची असल्याची माहिती आहे. ती काहीच दिवसात तिच्या मूळ गावी जाणार होती. त्यासाठी तिने गाडीचं तिकीटही बुक केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यापूर्वीच तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने वसतिगृहासह परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर वसतिगृहात काम करणारा वॉचमन तरुण घटनेपासून फरार होता. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत होते, परंतु तरुणाचा मृतदेह चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या रुळावर आढळून आला. तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असलेली ही तरुणी मंगळवारी सकाळपासून खोलीबाहेर न आल्याने इतर तरुणी तिच्या खोलीजवळ गेल्या. खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली होती. कडी उघडून पाहिले असता ही तरुणी खोलीमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळली. तरुणींनी वसतिगृहाच्या व्यवस्थापनाला कळवताच त्यांनी याबाबतची मरीन ड्राइव्ह पोलिस घटनास्थळी पोहोचले. मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तरुणीच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळलेला होता. तर शरीराच्या काही भागात बळजबरीच्या जखमा आणि खुणाही आढळून आल्या आहेत. याचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे.
Body of a 19-year-old girl found at a girls' hostel in Churchgate area in Mumbai. Her room was locked from the outside and she was found dead inside with a 'dupatta' around her neck. Police suspect that she was murdered after rape. A man working at the hostel is absconding ever…
— ANI (@ANI) June 6, 2023
सकाळपासून बेपत्ता असलेल्या वॉचमनचा मृतदेह रेल्वे ट्रकवर आढळल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून पोलिस संपूर्ण घटनाक्रम तपासत आहेत. ओमप्रकाश कनौजिया (वय ५३) असं संशयित वॉचमनचं नाव असल्याचं सांगण्यात येतंय. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची समोर येत आहे. या सुरक्षा रक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला होता. या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. आता त्या वॉचमनचा मृतदेह आढळला आहे. . याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.