(रत्नागिरी)
देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे दि.०१ जुन रोजी रत्नागिरी येथील शोरुम मध्ये शानदार कार्यक्रमामध्ये अल्त्रोझ सी. एन. जी. चे अनावरण श्री. अजित ताम्हणकर सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांचे हस्ते करण्यात आले. संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे.
जुनी कर देऊन नवीन कर घेणाऱ्या ग्राहकांचा अतिरिक्त लाभ करण्याच्या दृष्टीने आकर्षक एक्सचेंज बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे. एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात, राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाद्वारे प्रवेश केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरीतील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवेकरिता उपलब्ध करून दिले आहे.
टाटा कार श्रेणी अंतर्गत येणाऱ्या टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी. नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल पुंच, अल्त्रोझ, सफारी ७ सीटर, हॅरीअर ही सर्व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नुकतीच टाटा ने अलत्रोझ ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये कार ट्वीन सिलेंडर सी.एन.जी.मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने सदर कार चे बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी सौ. सुनील ग्रेस (चिफ मॅनेजर एस बी आय रत्नागिरी) श्री. अमोल कदम (सहा.वाहन निरीक्षक रत्नागिरी) श्री. मोहसीन आवटी ( सहा. वाहन निरीक्षक रत्नागिरी) श्री.कल्पेश जाधव ई.मान्यवर उपस्थित होते. ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कारच्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन री.कल्पेश जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.