(मुंबई)
दादर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा चाकूहल्ला सूडबुद्धीतून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींनी या हल्ल्यासाठी लाखोंची सुपारी दिल्याचे कबूल केले आहे. पनवेलच्या माजी उपमहापौरांच्या मुलाने ही सुपारी दिल्याचेही त्यांनी कबूल केले आहे.
मारेकऱ्यांच्या कबुली जबाबानंतर भोईवाडा पोलिसांनी आरोपी सिद्धांत गायकवाड याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हातणकर, नाझीर सय्यद, साकिब कुरेशी आणि यादव या चार हल्लेखोरांना शुक्रवारी भायखळा परिसरात भोईवाडा पोलिसांनी अटक केली. वंचितचे युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वंचितचे सदस्य गौतम हराळ यांनी दोन महिन्यांपूर्वी चुनाभट्टी येथे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे जगदीश गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत याला बदला घ्यायचा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी जगदीशने बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना राग आला आणि गायकवाड याना कथितपणे मारहाण केली. तसेच त्या मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला.
या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धांत गायकवाडने कथितपणे चार मारेकऱ्याना परशुराम रणसूर आणि हराल यांना धडा शिकवण्यासाठी ५ लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर चार आरोपींनी दादरमध्ये रणसुर आणि हराळ यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. २७ मे रोजी हा हल्ला झाला होता. दादरमधील आंबेडकर भवन परिसरात झालेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती.