(नवी दिल्ली)
भारतीय नेमबाज अभिनव शॉ आणि गौतमी भानोत यांनी जर्मनीमध्ये सुहल येथे 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवून ISSF विश्वचषक कनिष्ठ गटाच्या स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. भारताच्या शॉ आणि भानोत यांच्या संघानं सुवर्णपदकाच्या लढतीत ओशन म्युलर आणि रोमेन ऑफ्रेरे या फ्रेंच जोडी विरोधात १७-७ असा विजय नोंदवला. विश्वचषक स्पर्धेत गेले दोन दिवस झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.
भारतीय नेमबाज गौतमी भानोत आणि अभिनव शॉ यांनी रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) ज्युनियर विश्वचषकाच्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले लक्ष्य ठेवले होते. दोन दिवसांतील हे भारताचे दुसरे सुवर्ण आहे.
दरम्यान, 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक प्रकारात सेन्यामने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अभिनव चौधरीसह रौप्यपदक जिंकले. हे सुवर्ण कोरियन जोडी जुरी किम आणि कांगह्युन किमच्या वाट्याला आले. कांस्यपदक भारताच्या श्रुची इंदर सिंग आणि शुभम बिस्ला यांनी पटकावले.